SEAS २०२३- PARAKH | शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण विषयी जाणून घ्या

शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३- PARAKH


 शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३- PARAKH 


 दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३- PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने  राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक दिलेले आहे.

त्या नुसार राज्यात सदर सर्वेक्षण  दिनांक ०३.११.२०२३ रोजी करण्यात येणार आहे.

Time table SEAS - PARAKH

सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. 

या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर सर्वेक्षणात  जिल्ह्याची संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोणातून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

१. जिल्ह्यामध्ये केंद्रस्तरावरील परिषदेत सदर सर्वेक्षण तपशीलाबाबत खालील माहिती देण्यात येईल,

२. सर्वेक्षण ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळात घेण्यात येणार आहे.

३. सदर सर्वेक्षण हे ०२ नोव्हेंबर पूर्वतयारी व ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत सर्व विद्यार्थ्याना १००% उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.

४. OMR भरण्याचा सराव घेण्यात यावा.

५. शिक्षकांना NAS सर्वेक्षणातील प्रश्नासारखे प्रश्न निर्मिती बाबत मार्गदर्शन करावे.

६. चाचणीपूर्वी किमान १५ दिवस NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा. तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा सराव घ्यावा.

७. शाळास्तरावर प्रश्न तयार करून त्यांचा सराव घेण्यात यावा.

८. Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन व उपक्रमांचे साहित्य ( प्रश्न प्रश्नपेढी, अध्ययन निष्पत्ती संदर्भात मार्गदर्शन करावे.

  सदर सर्वेक्षणातून राज्याची शैक्षणिक स्थिती कळणार आहे.  तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील शिक्षणाची सध्यस्थिती समजणार आहे. 

 जिल्ह्याची संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा, तालुका, केंद्र, व शाळास्तरावर योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 जिल्हा, केंद्र, तालुका स्तरावर SEAS संदर्भात कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचे नियोजन व अमलबजावणी करणार आहेत.

सरावासाठी - 

NAS, SLAS, ETAS, MTAS, PAT च्या प्रश्नपत्रिकांची लिंक :

https://drive.google.com/drive/folders/१० SBSJxICFdxuZUDNdJob


● तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांची नियुक्ती  पुढीलप्रमाणे होणार आहे,

१. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त संख्येनुसार तालुका समन्वयक म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी हे असतील 

२. तालुका स्तरावर तालुका समन्वयक याची  २० शाळांना ०१ समन्वयक याप्रमाणे  नेमणूक करण्यात येईल.

३. २० शाळांना ०१ याप्रमाणे तालुक्यातील निवडलेल्या शाळांना तालुका समन्वयकाची नियुक्ती विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचेमधून नेमणूक  करण्यात येईल.

५. तालुका समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व बीआरसी यामधून नियुक्त करण्यात येईल.

६. क्षेत्रीय अन्वेषक (FI) प्रती शाळा ०१ याप्रमाणे एका शाळेला एक याप्रमाणे एक क्षेत्रीय अन्वेषक असेल.

७. क्षेत्रीय अन्वेषकांची नियुक्ती करताना डी. एल. एड मधील विद्यार्थी, बी.एड. मधील विद्यार्थी तसेच पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स, मास्टर ऑफ सोशल वर्क स्टुडन्ट, सेवानिवृत्त शिक्षक, ११ वीतील विद्यार्थी यांमधून प्राधान्याने निवडले जातील.

८. जर वर दिलेल्या मधून संख्या कमी पडली तरच फिल्डवरील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.  परंतु ते निवडण्यात आलेल्या शाळेमधील व लगतच्या शाळेतील शिक्षक नसतील.


PARAKH विषयी अधिक जाणून घेऊया

 राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक प्राधिकरण, PARAKH (Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge For Holistic Development ) यांना अधिसूचित केले आहे, ज्याचे उद्दिष्ट हे  देशातील  सर्व बोर्डांसाठी मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे हे आहे. 

  परख हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून तयार केले गेले आहे.  ज्यामध्ये नवीन मूल्यांकन पद्धती आणि नवीनतम संशोधनाबाबत राज्य अथवा केंद्रीय बोर्डांना  सल्ला देण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्यांला प्रोत्साहन देण्यासाठी PARAKH ची निर्मिती करण्यात आली आहे.

PARAKH हे  NCERT चा एक घटक म्हणून काम करणार आहे 

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (NAS) आणि स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे (SEAS) यांसारख्या नियतकालिक चाचण्या घेण्याचे कामही PARAKH करणार आहे.

 PARAKH  मुख्यतः मूल्यांकन क्षेत्रांवर  कार्य करणार आहे.

१) मोठ्या प्रमाणात मूल्यांकन 

२) शाळा-आधारित मूल्यांकन 

३) परीक्षा सुधारणा

PARAKH चे उद्दिष्ट:

एकसमान निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे: भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.

 21 व्या शतकातील महत्वाचे  कौशल्य पूर्ण करण्यासाठी ते शालेय मंडळांना त्यांचे मूल्यांकन पद्धती बदलण्यास मदत करणार आहे.

 PARAKH राज्य आणि केंद्रीय बोर्डांमध्ये एकसमानता आणणार आहे, जे सध्या मूल्यांकनाच्या विविध निकषांचा उपयोग करतात, ज्यामुळे मूल्यमापन व गुणांमध्ये मोठया प्रमाणात तफावत दिसून येते.

 सीबीएसई शाळांमधील त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत काही राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशादरम्यान गैरसोय होत असते ही गैरसोय पुढे होऊ नये या सर्व येणाऱ्या  समस्येचे निराकरण करण्यात मदत होणार आहे.

PARAKH च्या माध्यमातून  शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील चाचण्यांचे आराखडा,  विश्लेषण आणि अहवाल देण्यासाठी तांत्रिक निकष विकसित होणार आहेत. 

पारख शिक्षणासाठी सर्वसमावेशक, सहभागी आणि सर्वांगीण दृष्टीकोन सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवते, जे क्षेत्रीय अनुभव, अनुभवजन्य संशोधन, सहभागीचे अभिप्राय, तसेच सर्वोत्तम पद्धतींमधून शिकलेले धडे विचारात घेते.

 पारख हे  शिक्षण अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगतीशील बदल आहे.

PARAKH विषयी अधिक माहिती साठी PARAKH च्या पोर्टल 

 https://parakh.aicte-india.org/

Post a Comment

0 Comments